कळमेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्हयातील एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे. कळमेश्वर तालुक्यातील आदासा,धापेवाडा हे धार्मिक स्थळ असून विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. कळमेश्वर तालुक्यात जवळपास 6500- 7000 हे. क्षेत्र हे फळबागाखाली असून प्रामुख्याने संत्रा, मोसंबी हे फळपिक घेण्यात येते. सदर परिसरातील संत्रा हे उत्तम फळपिक असून नागपुरी संत्रा नावाने ओळखले जाते. कळमेश्वर तालुक्यात उबाळी घोराड परिसरात खूप मोठा नर्सरी उदयोग असून विविध प्रकारची शोभिवंत झाडांची लागवड करून विक्री केल्या जाते. सदर शोभिवंत झाडांचे नर्सरी उदयोग हा नागपूर जिल्हयातील सर्वात मोठा नर्सरी उदयोग असून आजूबाजूच्या गावातील मजूरांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. पंचायत समिती, कळमेश्वर ची स्थापना दिनांक 1 में 1962 रोजी झालेली आहे..पंचायत समिती कळमेश्वर चे एकुण क्षेत्रफळ 49826.61 हेक्टर आहे. लागवडी खालील क्षेत्र 34099 हेक्टर आहे पंचायत समिती अंतर्गत एकुण 105 गावे आहे....
पंचायत समिती कळमेश्वर
Certificate of Registration
अमृत महा आवास अभियान
माझी शाळा सुंदर शाळा
कॅन्सर मुक्त अभियान
पुण्यश्लोक
क्रीडा स्पर्धा आणी सांस्कृतिक महोत्सव